✍️मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सकाळी मॉर्निग वॉक दरम्यान देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे मॉर्निग वॉकला गेले असता त्यांच्यालर चार अज्ञातांकडून हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत.
एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने हल्ला करण्यात आला होता. पण देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. मात्र, त्यांच्या पायाला लागलं आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहे
