मुंबई – मला कुठल्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल असं काही केंद्रातील अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. निदान ठाणे महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरला आहे. माझ्याविरोधात काही केसेस नाही. परंतु ही जेव्हा बात येते जेव्हा आश्चर्य वाटतेच असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.राज्यावर ६ लाख ६६ हजार कोटींचे कर्ज
राज्यावर सध्या ६ लाख ६६ हजार कोटींचे कर्ज असून दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या ज्या घोषणा केल्या जातायेत त्यासाठी पैसे आहेत वाटत नाही. आर्थिक ते दृष्ट्या ही धोक्याची घंटा आहे. अशाच पद्धतीने राज्य कारभार चालला तर महाराष्ट्रात दिवाळखोरी होईल असा आरोप एनसीपी नेते जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर केला.
त्याचसोबत केंद्र सरकारने जे मोफत धान्य आणि मोफ रेशन दिले आहे तेव्हा मोफत देऊन काही होत नसते तुम त्या हातांना काम द्या जे काम त्यांना रेशन घरात घेऊन
प्रोडक्शन वाढवणारे श्रममूल्य दिले पाहिजे. दोन लाख कोटी रुपयांचे फुकट धान्य त्यामुळे बेरोजगारीचा आलेख कुठेही खाली येताना दिसत नाही. जीडीपी रेट मागच्या वर्षी आठ दाखवला होता आणि या वर्षी सहा पूर्णांक काहीतरी दाखवला आहे तो सुद्धा फुगवून दाखवलेला आहे. देश सावरणे सध्या फार आवश्यक आहे नाहीतर देशातील सर्वसामान्य लोक अडचणीत येतील असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.