✍️:माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून आमचे सरकार हे कायदेशीर मार्गाने स्थापन झाल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. या निर्णयाचा स्वीकार करतानाच यापुढे अधिक जोमाने सर्वसामान्य माणसासाठी काम करण्याची ग्वाही देखील यावेळी दिली.
वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी तसेच शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादी होऊ नये म्हणून आम्ही केलेल्या संघर्षाला मिळालेले हे यश असून आज त्यांच्या आत्म्याला नक्कीच आनंद आणि समाधान वाटले असेल अशी भावना यासमयी बोलताना व्यक्त केली.
यावेळी आधी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर त्यानंतर वर्षा या निवासस्थानी मित्र पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासह हा आनंदक्षण साजरा केला. तसेच कर्तव्यभावनेतून काम करणाऱ्या पोलिसांचे तोंड गोड करून त्यांना उन्हापासून बचाव व्हावा यासाठी छत्रीचे वाटप केले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, #शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.