Aircraft Crashed in MP, Rajasthan : राजस्थानमध्ये एका विमानाचा तर मध्यप्रदेशात हवाईदलाच्या २ विमानाचा अपघात झाला आहे. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उचैन पिंगोरा येथे लष्कराचे विमान कोसळले.तसेच मध्य प्रदेशातील मुरैना येथे आज (शनिवार) सकाळी मोठा अपघात झाला. ज्यात हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-३० आणि मिराज २००० क्रॅश झाली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई करत आहेत. या दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते, जेथे सराव सुरू होता. पहाटे साडेपाच वाजता हे विमान कोसळले. दरम्यान दोन्ही वैमानिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
ओ*गडचिरोली - वैनगंगा नदीपात्रात ठिय्या आंदोलन!*
गडचिरोली, दि. ५ एप्रिल – वैनगंगा नदीपात्रात गोसेखुर्द धरणाचे पाणी तातडीने सोडावे, या प्रमुख मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या...
गडचिरोली, २ एप्रिल २०२५ :: माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या अथक पाठपुराव्याला यश आले असून, त्यांच्या मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी तब्बल ३...