राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे. राजकीय जबादारीमधून मुक्त होऊन उर्वरित आयुष्य चिंतन मनन करत घालवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राने राज्यपाल पदाच्या काळात भरभरून प्रेम दिलं याबद्दल त्यांनी आभार सुद्धा व्यक्त केले आहेत.
