Buldana Agriculture News : राज्यात हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं थंडीचा कडाका (Cold Weather) तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं (Rain)देखील हजेरी लावली आहे. अशा वातावरणाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. बुलढाणा (Buldana) जिल्ह्यात गुरुवार (27 जानेवारी) पावसानं हजेरी लावल्यानंतर आज जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळं पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर काल अनेक भागात अवकाळी पाऊस पडला आहे. तर आज सकाळी जिल्ह्यात सर्वत्र दाट धूक्याची चादर बघायला मिळत आहे. धुक्यामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सध्या कांदा लागवडीचे (Onion Cultivation) दिवस आहेत. त्यामुळं नुकताच लागवड करण्यात आलेल्या कांद्यावर अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळं अनेक रोगांचा हल्ला होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच गहू, हरभरा या पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे.
✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...
✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...