✍️ देसाईगंज
राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष लतीफ जब्बर शेख यांनी जिल्हा अद्यक्ष रवींद्र वासेकर यांच्याकडे राजीनामा साेपविला.
२० वर्षे पूर्ण प्रामाणिकपणे काम करणारे आणि गेल्या ८ वर्षांपासून वडसा शहराध्यक्ष असलेले लतीफ शेख यांनी अखेर शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याकडे अनेक प्रकारे पाहिले जात आहे. त्यांनी राजीनाम्याचे कारण सांगितले नाही. लतीफ शेख यांनी जिल्हाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, तुम्ही आजपर्यंत त्यांच्यावर दाखवलेल्या
विश्वासाबद्दल मी आभारी आहे. जर माझ्यामुळे पक्षाचे काही नुकसान झाले असेल किंवा कोणाला वाईट वाटले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. गेल्या १५ ते २० वर्षांपासून मी निस्वार्थपणे पक्षाची सेवा करत असल्याने मला राजीनामा देताना खूप वाईट वाटत आहे. मी अल्पसंख्याक विभागाचा जिल्हाध्यक्ष म्हणून ५ ते ६ वर्षे यशस्वी काम केले आहे. माझा राजीनामा स्वीकारून मला पदमुक्त कराल हिच विनंती ,२० वर्षे काम केल्यानंतर लतीफ शेख यांनी अचानक राजीनामा का दिला? पक्षात चर्चा सुरू झाली आहे.