विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

बाळासाहेबठाकरे यांच्या विचारातून अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आणि ऊर्जा सर्वसामान्यांना मिळाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांची शिकवण, विचार आणि वारसा घेऊन पुढे जात आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
