✍️आरमोरी – स्थानिक श्रीमती वत्सलाबाई वनमाळी स्कुल ऑफ स्कॉलर्स आरमोरी येथे दिनांक 08/03/ 2023 रोजी जागतिक महिला दीन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक नितीन कासार तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक किरण मांडवकर, सांस्कृतिक विभाग प्रमूख विद्या राखडे,रविकांत म्हस्के, अमीत राऊत, अंकुश जौंजळकर यांनी स्थान भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती आणि श्रीमती वत्सलाबाई वनमाळी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन कासार सर यांनी महिलांचे प्रत्येक क्षेत्रातील स्थान विस्तृतपणे समजावून सांगितले.त्याचप्रमाणे वर्ग 8वी चा विद्यार्थी शौर्य जुआरे याने जागतिक महिला दिननिमित्त भाषण केले.तसेच यश चीलबुले आणि विकल्प सिडाम यांनी जागतिक महिला दिवस वर चित्र रेखाटले व माहिती सांगितली. सर्व महिला शिक्षक तसेच महिला शिक्षकेत्तर कर्मचारी यांना पुष्गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन नैमा पठाण यांनी तर आभार सुनीता टिचकुले यांनी मानले राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्व शिक्षक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
