Thursday, February 6, 2025
HomeUncategorized28 ते 30 जानेवारी व 2 फेब्रुवारीला मद्य विक्री बंद

28 ते 30 जानेवारी व 2 फेब्रुवारीला मद्य विक्री बंद

# padvidhar nivadnuk#

महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणुकीसाठी 2 पदवीधर तसेच 3 शिक्षक मतदारसंघाची दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे मतदान 30 जानेवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. 28 ते 30 जानेवारी व 2 फेब्रुवारीला मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणुकीसंदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ तथा उपायुक्त (सा.प्र.) विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर यांचे आदेशान्वये नागपूर विभागात 30 जानेवारीला मतदान व 2 फेब्रुवारीला मतमोजणी प्रक्रीया पार पाडली जाणार असून जिल्हयाची संवेदनशिलता लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोणातून 28 जानेवारीला दुपारी 4 वाजेपासून ते 30 जानेवारी दुपारी 4 वाजेपर्यंत तसेच 2 फेब्रुवारीला निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई असून कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता संपूर्ण जिल्हयाच्या मतदानाच्या निर्वाचन क्षेत्रातील किरकोळ मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135-सी अन्वये निवडणूक होत असलेल्या जिल्हयातील विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निर्वाचन क्षेत्रातील सर्व मंजूर व कार्यान्वीत असलेल्या सर्व नमुना सीएल-2, सीएल-3, सीएल / एफएल / टिओडी-3, नमुना-ई, एफएल-1, एफएल-2, एफएल-3. एफएल/बीआर-2 व टड 1 अनुज्ञप्त्या 28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारी या तीनही दिवशी बंद राहतील, असे आदेशीत करण्यात आले आहे.
या आदेशाचा व नियमातील तरतुदीचा जे अनुज्ञप्तीधारक भंग करतील त्यांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
???????

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

✍️गडचिरोली दि. 22: राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज गडचिरोलीत प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्ह्यातील विकास कामांना गती देत त्या पूर्ण वेगाने पूढे...

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार ‘गडचिरोलीसाठी’ महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवशी 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार

✍️गडचिरोली दि.22 : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात गुंतवणूकिचा पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात...

Recent News

Most Popular

Recent Comments