✍️: विधानसभा क्षेत्रात भाजप बंडखोर विद्यमान आमदार डॉ. होळी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजप श्रेष्ठींनी केलेल्या मध्यस्थीनंतर डॉ. होळी नरमले, डॉ. होळी यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती, भाजप उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा मार्ग झाला सुकर
आरमोरी विधान सभा क्षेत्रात माधुरी मडावी,वामन सवसागडे,नीलेश हलामी,रमेश मानगडे यांनीही उमीदवारी अर्ज मागे घेतला..
1) अंधेरी पश्चिम येथून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मोहसीन हैदर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अशोक जाधव यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी आहे. माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अशोक जाधव यांना दिलासा मिळाला आहे.
2) औसा विधानसभा मतदारसंघातून संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. औसा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार दिनकर माने हे आहेत.
पालघर विधानसभेतील बंडखोरी मोडीत काढण्यात देखील महायुतीला यश आलं आहे. भाजपामधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमित घोडा यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. पालघर विधानसभेत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करून अमित घोडा मागील तीन दिवसांपासून नॉट रिचेबल होते.
4) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. बीड विधानसभा मतदारसंघात सलग चार वेळेस निवडून आलेले जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. जय दत्त क्षीरसागर हे अपक्ष म्हणून बीड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दोन पुतणे निवडणुकीच्या मैदानात आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून पुतणे योगेश क्षीरसागर, तर दुसरे पुतणे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट संदीप क्षीरसागर आहेत. 5) तुळजापूरमधील काँग्रेसचे बंड शमलेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तुळजापूर मधून उमेदवारी न मिळाले बंडाचा झेंडा फडकत मधुकरराव चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.पक्षश्रेष्ठींच्या शिष्टाईनंतर मधुकरराव चव्हाण यांनी माघार घेतली. काँग्रेसचे धीरज पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाचे राणा जगजीत सिंह पाटील व काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यातील लढत निश्चित आहे.6) शिवसेनेने देवळाली मतदारसंघात दिलेला एबी फॉर्म मागे घेतला. देवळाली मतदारसंघातील उमेदवार राज्यश्री अहिरराव यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. राजश्री अहिराव कालपासून नॉट रिचेबल होत्या. शिवसेनेने आदेश देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पक्षांतर्गत बैठक होऊन निवडणूक अधिकाऱ्यांना उमेदवारी रद्द करण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या.7) तुमसर येथून मधुकर कुकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला 8) अकोला पश्चिम मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार झिशान हुसैन यांनी माघार घेतली. झिशान हुसैन यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि वंचित मध्ये प्रवेश घेतला होता. यानंतर वंचित बहुजन आघाडीने झिशान हुसैन यांना अकोला पश्चिमची उमेदवारी दिली होती. झिशान हुसैन हे माजी राज्यमंत्री अझर हुसैन यांचे सुपुत्र आहेत.9) रायगड – अलिबागमधून ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांची माघारउद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे10) सांगली – मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर सी आर सांगलीकर,मोहन व्हनखंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बंडखोर बाळासाहेब व्हनमोरे या तिघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजप बंडखोर विद्यमान आमदार डॉ. होळी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजप श्रेष्ठींनी केलेल्या मध्यस्थीनंतर डॉ. होळी नरमले, डॉ. होळी यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती, भाजप उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा मार्ग झाला सुकर
17) भाजपाचे सांगली विधानसभा मतदारसंघातील बंडखोर शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी घेतली माघार.भाजपाने उमेदवारी दिली नाही,,म्हणून शिवाजी डोंगरे यांनी दाखल केली होती उमेदवारी.18) नाशिक मध्यचे उमेदवार अजित पवार गटाचे बंडखोर शहराध्यक्ष अपक्ष रंजन ठाकरे यांनी घेतली माघार 19) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे रणजीत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. शेवटची पाच मिनिटं बाकी असताना फॉर्म मागे घेतल.