काही देशांमध्ये COVID19 ची वाढती प्रकरणे पाहता, आज तज्ज्ञ आणि अधिकार्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला. कोविड अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्याचे आणि परिस्थितीवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
आम्ही कोणत्याही परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यास तयार आहोत, असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ट्विट केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मास्क,बुस्टर डोस आणि विमानसेवेसंदर्भात काय चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले याची माहिती नीति आयोग (आरोग्य)चे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी दिली.
इथे मास्क वापरा!
तुम्ही खोलीत किंवा घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी असाल तर मास्क वापरा. आजारग्रस्त किंवा अधिक वय असलेल्या लोकांसाठी हे सर्व अधिक महत्त्वाचे असल्याचेही, डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले.
आतापर्यंत केवळ 27-28% लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. आम्ही इतरांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करतो. बुस्टर डोस प्रत्येकासाठी अनिवार्य असल्याचे डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले.
विमान वाहतुकीच्या बाबतीत सध्या कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती नीति आयोग (आरोग्य) चे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या कोविडवरील बैठकीनंतर दिली.
??????????????????
