Friday, January 17, 2025
HomeUncategorizedNASA James Webb Space Telescope : अंतराळामध्ये (Space) अनेक रहस्य लपलेली आहेत,...

NASA James Webb Space Telescope : अंतराळामध्ये (Space) अनेक रहस्य लपलेली आहेत, असं बोललं जातं.

# जगभरातील अनेक वैज्ञानिकांकडून याबाबत संशोधन सुरु आहे. आता अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) अंतराळातील आणखी एका रहस्यावरील पडदा उघडला आहे, असे म्हणावे लागेल. नासाने नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीप्रमाणे आणखी एक ग्रह शोधला आहे. हा ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपने पहिल्यांदा सौर्यमालेबाहेरील नवीन ग्रहाचा शोध लावला आहे. नासाने शोधलेल्या या ग्रहाला वैज्ञानिकांनी LHS 475 b असे नाव दिले आहे.

जगभरातील अनेक वैज्ञानिकांकडून अवकाशासंदर्भात संशोधन सुरु आहे. पृथ्वीसारखे आणखी ग्रह, तेथील जीवन, सूर्यमाला शोधण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. नव्या ग्रहाच्या शोधामुळे तेथील वातावरण आणि सूर्यमालेची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. शास्त्रज्ञांकडून याबाबत अधिक संशोधन सुरु आहे.

शास्त्रज्ञांना सापडला पृथ्वीसारखा ग्रह

नासाने जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या साहाय्याने या ग्रहाचा शोध लावला आहे. नासाचा जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप सौरमालेबाहेरील ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी वापरला जातो. ही एकमेव दुर्बीण आहे, जी सूर्यमालेच्या बाहेरील पृथ्वीच्या आकाराच्या ग्रहांचे वातावरण शोधण्यास सक्षम आहे. जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप ही दुर्बिण लाँच झाल्यापासून नासासाठी खूप प्रभावी ठरली आहे.

नव्या ग्रहावरही पृथ्वीप्रमाणे डोंगराळ भाग

नासाने शोधलेल्या LHS 475 b या ग्रहाचा आकार साधरणपणे पृथ्वीच्या आकाराएवढा आहे. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, या ग्रहावरही पृथ्वीप्रमाणे डोंगराळ भाग आहे. नासाने ट्रांसिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट (TESS) च्या मदतीने या नवीन ग्रहाच्या आकाराचा शोध लावला आहे. लॉरेल, मेरीलँड येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अप्लाइड फिजिक्स प्रयोगशाळेतील एका टीमने वेब स्पेस टेलिस्कोप वापरून LHS 475 b ग्रहाचे निरीक्षण केले आहे.नवा ग्रह पृथ्वीच्या व्यासाच्या 99 टक्के

हा ग्रह पृथ्वीच्या व्यासाच्या 99 टक्के आहे. दरम्यान, शास्त्रज्ञ अद्याप हा ग्रहावरील वातावरण आणि रचना याबद्दल अनिश्चित असून त्याबाबत अधिक अभ्यास आणि संशोधन सुरु आहे. पण हा ग्रह पृथ्वीच्या व्यासाच्या 99 टक्के आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 41 प्रकाशवर्षे अंतरावर ऑक्टन्स नक्षत्रामध्ये आहे. हा ग्रह पृथ्वीपेक्षा काही अंश जास्त गरम असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -
spot_img
भरत दयलानी
मुख्य सपांदक
phone
RELATED ARTICLES
spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -spot_img

48 नक्षलवाद्यांनी लॉयड्स मेटल्समध्ये काम करून नवीन मार्ग शोधला

✍️ गडचिरोली:  नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतल्याने आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. वास्तविक, येथील पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या ४८ नक्षलवाद्यांना अलीकडेच स्थापन झालेल्या लॉयड्स मेटल्स...

गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला.

गडचिरोली., 9 जानेवारी (हिं.स.)।छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना...

Recent News

Most Popular

Recent Comments